चीनी अॅप बॅन च्या निमित्ताने
काल दि. २९ जुन, २०२० ला भारत सरकारने ५९ चीनी अॅप ला बॅन केले. जेव्हा हा निर्णय घेण्यात आला तेव्हा बऱ्याच समाजमाध्यमावर एक प्रश्न फिरत होता. बॅन योग्य कि अयोग्य? मला वाटतं प्रश्न असा असायला हवा होता. अॅप बॅन केल्याचा आपला फायदा काय?
तर मित्रांनो आपण २०१९ मध्ये जाऊ. तेव्हा काही कालावधीसाठी tiktok app बॅन करण्यात आलं होतं. तेव्हा tik tok ची कंपनी Bytedance ने कोर्ट फाईलिंग मध्ये असं सांगितलं कि त्यांचं प्रतिदिवस $५००००० चं नुकसान होत आहे. जे भारतीय रुपयात होतं ₹ ३ कोटि ८० लाख!!!!
वर्षाचे सरासरी ₹१३-१४ अब्ज रुपये!!!!!!
हि फक्त tik tok ची कमाई भारतातील ग्राहकांकडून. त्यांचे ३०% ग्राहक भारतीय आहेत. असे बरेच चीनी अॅप आहेत. तर त्यांना आपण किती पैसे पुरवतोय याची कल्पना करा.
कदाचित काहि लोक प्रश्न करतील , तुम्हाला काय अडचण? सांगतो.
Tiktok, club factory, uc browser etc..या सारख्या अॅप चे केवळ भारतातच ५० कोटी वापरकर्ते आहेत. त्यातील एकट्या tiktok चे १० कोटी. गोष्ट इथे संपत नाही. भारतीय ग्राहकांनी २०१९ मध्ये ५५० कोटी तास tiktok वर घालवलेत!!!! यावरून एवढा अंदाज लागेल कि तरुण पिढी चा किती वेळ यात जातोय. वरवर पाहिलं तर नुकसान काय?
१) आपन त्यांना पैसे कमवून देतोय. कोणाला? चीन ला. जो आपला मित्र राष्ट्र नाहि.
२) आपल्या तरूण पिढी चा अमुल्य वेळ वाया जातोय. भारत हा तरुणांचा देश आहे. हि तरुण शक्ति योग्य कामात लावली तर बदल घडवून आणू शकते.
३) कुठेतरी असं नाही वाटत का कि या आभासी दुनियेमध्ये जगताना आपण आपल्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतोय. आपल्या आजूबाजूला व आयुष्यात काय घडतंय किती लोकांना जाणिव असते.
Tik tok ने बऱ्याच लोकांना पैसे कमवून दिले असा एक युक्तिवाद केला जातो. पण त्याचं प्रमाण काय? ह्या उत्पन्नाच्या स्रोत पुर्ण निर्भर राहणं किती योग्य आहे?
१ .५ GB संपवण्यात आपलं भविष्य तर संपत नाहिये ना? याचापन कुठेतरी विचार व्हायला हवा.
आज आपल्या सरकारने हे अॅप बॅन केले. उद्या याची जागा कोणतं ना कोणतं अॅप घेईलच. प्रश्र्न हा कि आपल्या प्राथमिकता काय? आपला प्राधान्यक्रम काय असला पाहिजे?
मला एवढंच म्हणायचंय कि आपली प्राथमिकता, प्राधान्यक्रम ओळखा. बाजारात tik tok सारखे खुप प्रोडक्ट येतील. विकणं त्यांच काम आहे. पण आपल्या साठी योग्य काय हे आपण ठरवायला हवं.
पटतंय ना? नक्की सांगा.
- गुरू बारगजे
www.gurusreads.blogspot.com
www.gurudasbargaje.blogspot.com
Comments
Post a Comment