चीनी अॅप बॅन च्या निमित्ताने
काल दि. २९ जुन, २०२० ला भारत सरकारने ५९ चीनी अॅप ला बॅन केले. जेव्हा हा निर्णय घेण्यात आला तेव्हा बऱ्याच समाजमाध्यमावर एक प्रश्न फिरत होता. बॅन योग्य कि अयोग्य? मला वाटतं प्रश्न असा असायला हवा होता. अॅप बॅन केल्याचा आपला फायदा काय? तर मित्रांनो आपण २०१९ मध्ये जाऊ. तेव्हा काही कालावधीसाठी tiktok app बॅन करण्यात आलं होतं. तेव्हा tik tok ची कंपनी Bytedance ने कोर्ट फाईलिंग मध्ये असं सांगितलं कि त्यांचं प्रतिदिवस $ ५००००० चं नुकसान होत आहे. जे भारतीय रुपयात होतं ₹ ३ कोटि ८० लाख!!!! वर्षाचे सरासरी ₹१३-१४ अब्ज रुपये!!!!!! हि फक्त tik tok ची कमाई भारतातील ग्राहकांकडून. त्यांचे ३०% ग्राहक भारतीय आहेत. असे बरेच चीनी अॅप आहेत. तर त्यांना आपण किती पैसे पुरवतोय याची कल्पना करा. कदाचित काहि लोक प्रश्न करतील , तुम्हाला काय अडचण? सांगतो. Tiktok, club factory, uc browser etc..या सारख्या अॅप चे केवळ भारतातच ५० कोटी वापरकर्ते आहेत. त्यातील एकट्या tiktok चे १० कोटी. गोष्ट इथे संपत नाही. भारतीय ग्राहकांनी २०१९ मध्ये ५५० कोटी तास tiktok वर घालवलेत!!!! यावरून एवढा अंदाज लागेल कि तरुण पिढी चा किती वेळ...