HAPPY NEW YEAR 2021
परत एक नविन वर्ष सुरुवात होणार....अगदी दरवर्षी होत तसच . पण या वर्षात आणि ईतर नविन वर्षात खुप फरक आहे. काय काय पहायला मिळाल, कित्येक अनुभव आले. बरच शिकायला भेटल. एक नविनच आयुष्य भेटल्यासारख वाटलं. नविन वर्ष साजरं तर दरवर्षी करतो पण या वर्षी अस काय नविन....मलाच काय पण अपल्यापैकी कित्येकांना वाटल असेल, निदान एकदा तरी की आपण 2021 पाहू की नाही....हो ना? मलाही वाटल होत. त्यावेळीची अनिश्चीतता नक्किच अस्वस्थ करणारी होती पण त्यामधे एक चांगली गोष्ट झाली, आपण ज्या rat रेस मधे धावतोय त्याला कुठेतरी ब्रेक लागला, आयुष्यात थोड्या काळापूरते का असेना पण अपल्या priorities ची आपल्याला जाणीव झाली. काय हव होत तेव्हा माहितीये? हवं होत एक आयुष्य ....जरा अजुन वेळ ....स्वतःसाठी आणि जे आपल्याला जीव लावतात त्यांच्यासोबत अजुन जगण्यासाठी...तेव्हा कळल आयुष्यात ज्या गोष्टीना मुळात urgent समजायचो त्या तेवढ्या urgent नव्हत्याच. बस्स सगळे पळतायत म्हणूण आपण पळतोय. पण काही विसरत होतो नक्किच, जे आपले आहेत...आपल्यासाठी आहेत त्यांच्यासाठीच आपल्याला वेळ नव्हता. जेव्हा पण हा covid-19 जगातुन जाईल, सगळ पुर्वपदावर येइल,परत...